तळेगाव दाभाडे– सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजकार्य करणारे समाजभूषण किशोर आवारे यांचा असल्याचे मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. ते किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, माजी नगराध्यक्ष सुलोचनाताई आवारे, राजेंद्र जांभुळकर, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, कामगार नेते इरफान सय्यद, राजेंद्र खांडभोर, कुलदीप बोडकेे, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले दातृत्व,नेतृत्व याचा संगम लाभलेला कार्यकर्ता म्हणून किशोर आवारे यांची ओळख आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी अनेक जण येतात. परंतु निस्वार्थ वृत्तीने काम करणारे नेतृत्व म्हणून किशोर आवारे यांच्याकडे पाहिले जातं. तसेच बारणे यांनी आवारे यांनी कोरोना काळात, तसेच कोल्हापूर सांगली, कोकण या ठिकाणी घडलेल्या अतिवृष्टीच्या प्रसंगी निस्वार्थपणे पिडीताना केलेली मदत याचा आढावा देत अशा समाज कार्य करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे मत व्यक्त केले.
यावेळी आवरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. स्वागत मा, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांनी केले. प्रास्ताविक जनसेवा विकास समितीच प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष कल्पेश भगत, विनया केसकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन जनसेवा विकास समिती मित्र परिवाराने पार पाडले
मला खुर्चीचा मोह नसून मी जमिनीवर राहून सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता आहे. माझे कार्यकर्ते, माझे मित्र, हेच माझं कुटुंब आहे.असे मत जनसेवा विकास समिती संस्थापक अध्यक्ष, सत्कारमूर्ती किशोर आवारे यांनी व्यक्त केलं.




