कार्ला– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत जे घरमालक खोल्या भाड्याने देत असतील त्यांनी सात दिवसात त्याच्या भाडेकरूंची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीसांकडे सादर करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.
याबाबत माहिती सादर करण्याचा विहित नमुना अर्ज लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहे. याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी आदेश पारीत केलेले असून सात दिवसात सर्व घरमालकांनी आपणांकडे भाडयाने असलेल्या भाडेकरू यांची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे न चुकता सादर करावी.
जे घरमालक भाडेकरूंची माहिती सादर करणार नाहीत अशा घरमालकांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.




