आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 726 या समाधी सोहळ्यानिमित्त अनेक भक्तजन आळंदी मध्ये दाखल झाले आहेत आळंदी मधील वातावरण राम कृष्ण हरीच्या जयघोषाने भक्तमय झाले आहे. इंद्रायणी नदीकाठी अनेक भक्ताने एकत्र येत भजन कीर्तन करताना दिसत होते. संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली आहे. आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.

श्री राम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वैकुंठवासी अवधूत गुरुजी संग्राले दिंडी दहेगाव यांच्या भक्त जणांच्या उपस्थितीमध्ये काकडा संगीत, भजन हरिपाठ कीर्तन यांचा भव्य व दिव्य नियोजन केले आहे. हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पांचाळ व शिष्य मंडळ यांनी अप्रतिम असं नियोजन केले आहे.
रोज सकाळी आणि संध्याकाळी कीर्तनाचे कार्यक्रम तसेच गाथा भजन पारायण होणार आहे. जालना जिल्ह्यातील वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षी ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आठ दिवस सत्याचे नियोजन केले जाते. सर्व वारकऱ्यांना मोफत सुविधा देऊन बाराही महिने अन्नदानाचे काम या दिंडीच्या माध्यमातून केले जाते. प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सतत दानशुरांच्या देणगीतून व दानातून अवधूत गुरुजी यांच्या स्मरणार्थ भागातील वारकरी भक्तजन व वारकरी संप्रदायांना मदत करतात. कार्यक्रमाला मोहन महाराज शिंदे, विश्वनाथ चोरगे, विठ्ठल महाराज पांचाळ व दहेगाव येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.




