लोणावळा : कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला आलेल्या मुंबईतील एका शाळेच्या शिक्षकाच्या बसला परतीच्या मार्गावर असताना खंडाळा घाटात अपघात झाला.
यामध्ये बस रस्त्यात पलटी झाल्याने बसमधील 19 जणांपैकी 7 जण किरकोळ तर 1 जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी व्यक्तीच्या डोक्याला मार लागला आहे. सर्वांवर खोपोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सायमाळ येथे सदरचा अपघात झाला. चेंबूर येथील एका शाळेचे शिक्षक एकविरा देवीच्या दर्शनाला एका खाजगी बसने (क्र. एम.एच.03.सी.व्ही.3609) या बसने आले होते. परत जात असताना सायमळा येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन बाजुला केल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.




