आर्थिक दुर्बल घटकासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या ३३१७ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या १५६६ सदनिका बांधल्या. त्यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग नागरिकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
आर्थिक दुर्बल घटकासाठी बांधण्यात आलेल्या ३३१७ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठीच्या १५६६ सदनिका आरक्षीत करण्यासाठी प्राधिकरणाकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या ३३१७ सदनिकांसाठी हजारो आर्ज प्राप्त झाले. त्यातून छाननी करून पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा विकल्या देण्यात आला. या गटासाठीच्या सर्व सदनिका विक्री करण्यात प्रशासनाला यश आले. तर, अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या १५६६ सदनिकांसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, पीसीएनटीडीए ही आस्थापना पीएमआरडीएमध्ये विलीन केल्यानंतर पुन्हा अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली.
त्यावर १५६६ पैकी ८५० सदनिका गेल्या आहेत. उर्वरीत ७१६ सदनिकांसाठी अर्ज करण्यास नागरिकांमध्ये उदासिनता असल्याचे चित्र आहे. पेठ क्रमांक १२ मधील आर्थिक दुर्बल घटकासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राचे घर (१ बीएचके) घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये अनिवार्य आहे. लाभार्थ्यांना या घरासाठी ७ लाख ४० हजार रुपये किंमत मोजावी लागली. तर अल्प उत्पन्न गटातील ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राचे घर (२ बीएचके) घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ ते ६ लाख रुपये निश्चित केली आहे.
या घरांची किंमत ३२ लाख रुपये ठेवली आहे. नागरिकांनी २ बीएचके घराच्या किंमतीवर सुरुवातीपासून आक्षेप घेतला आहे. जर, वार्षीक उत्पन्न मर्यादा ३ ते ६ लाखापर्यंत असेल तर पात्रताधारक लाभार्थ्यांना हक्काची घरे घेण्यासाठी जास्तीत बँकेचे कर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे घराची किंमत आणि अटी-शर्ती यामध्ये असे आवाहन पीएमआरडीएच्या विसंगती असल्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहे.




