पुणे : ठेव विमा – महामंडळाने दिलेल्या सूचनेनुसार आता रूपी को. ऑप बँकेच्या ठेवीदारांना ५ लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेव मिळणार आहे. त्यासाठी बँकेकडून अर्ज मागविण्यात रुपी आले असून, ठेवीदारांनी विहित नमुन्यानुसार अर्ज करावे लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
सदर अर्जासोबत दोन फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड (स्व- साक्षांकित), मुदतठेव पावती, सेव्हिंग्ज / रिकरिंग खाते असल्यास पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत इ. कागदपत्रे दोन प्रतींमध्ये जोडणे आवश्यक आहे. तसेच क्लेमची रक्कम जमा होण्यासाठी, रुपी बँकेशिवाय अन्य बँकेतील खात्याचा कॅन्सल्ड सही न केलेला धनादेश (चेक) जोडावा लागेल. असा धनादेश नसल्यास, त्या खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत द्यावी लागेल. सदर धनादेश अथवा पासबुकवर खातेदाराचे नाव व सदर बँकेचा IFSC Code असणे आवश्यक आहे.



