पिंपरी ( प्रतिनिधी) – बंद केलेल्या रस्त्याने जाणाऱ्या – दोघांना अडविल्याने दोघांनी पोलीस महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. त्यानंतर जवळच असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २०) सायंकाळी देहूफाटा चौक, आळंदी येथे घडली.
भूषण मनोज जैन (वय ३०, रा. घोलपवस्ती, आळंदी) दत्तात्रय रामा कोकरे (वय २३, रा. गोलेगाव, ता. खेड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय पोलीस कर्मचारी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देहफाटा चौकातून आळंदी बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता यात्रेच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता. आरोपी त्यांची दुचाकी त्या रस्त्याने घेऊन जात होते. त्यामुळे तिथे कर्तव्यावर असलेल्या फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेने दोघांना अडवले. त्यावरून आरोपींनी आरडाओरडा करून गैरवर्तन करत विनयभंग केला. पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली. एक पोलीस अंमलदार हा वाद सोडवत असताना त्यांना मारहाण करून केली.




