पुणे: सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असेत अशा पोलिसांनीच दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारमध्ये जाऊन धिंगाणा घालणाऱ्या पुणे पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील ३ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन हॉटेलमध्ये गोंधळ घातला. फरासखाना पोलिस स्टशेनचे पोलिस अमंलदार उमेश मरीस्वामी, समर्थ वाहतुक विभागातील पोलिस अमंलदार अमित सुरेश जाधव आणि चंदननगर पोलिस स्टेशनचे पोलिस अमंलदार योगेश भगवान गायकवाड यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल दशरथ मद्रे यांनी या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता फिर्यादी मद्रे हे त्यांच्या हॉटेल मेट्रो मध्ये हॉटेल बंद करण्यासाठी काम संपवत होते. त्यावेळी मठपती, जाधव आणि गायकवाड हे तिघेही हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी बार काऊंटरवर दारू पिऊन आणखी दारू पिण्यासाठी मागणी केली. मात्र हॉटेल बंद करायचे असल्यामुळे मॅनेजरने तसेच हॉटेल मालकाला धमकी देऊन हॉटेल मध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.




