निगडी : निगडी परिसरात असलेल्या वीरशैव लिंगायत समाज दफनभूमीची दुरवस्था झाली आहे; पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागात वीरशैव लिंगायत समाजाची दफनभूमी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून, दफनभूमीची दुरवस्था झाली आहे. यासोबतच परिसरात खड्डे पडले आहेत. गवत वाढले आहे, कचरा साचला आहे.
या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाने वेळोवेळी केला आहे.
मोरवाडी येथील शिवकैलास दफनभूमी लोकसंख्येच्या मानाने पुरेसा नाही. याकरिता नवीन प्रशस्त व सर्व सोयीने युक्त असे दफनभूमीची मागणी माननीय आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वेळोवेळी केला असला तरी, आजतागायत त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही आणि असलेली दफनभूमीची दुरावस्था सुद्धा सुधारण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाही.
-शिवानंद चौगुले
(विशेष कार्यकारी अधिकारी)




