मोशी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ,मोशी या शाळेत अतिशय आनंदमयी वातावरणात बालदिन साजरा करण्यात आला.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग वारसा या संकल्पनेतुन विविधरंगी वेशभुषा परीधान करुन बालदिन साजरा केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ढाेल-ताशा पथकाचे संचलन उत्तम झाले. संस्थाध्यक्ष श्री.विनायक भाेंगाळे यांनी नितीमुल्ये, सामाजिक बांधिलकी,समतावाद याचा शालेय विद्यार्थ्यांशी असलेल्या संबंधावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. संजय भाेंगाळे ,संचालीका साै. कविता कडु पाटील, विश्वस्त साै. सरीता विखेपाटील मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित हाेते.




