मोशी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ,मोशी या शाळेत संविधान दिन अतिशय आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमीत्त शिक्षकवृंदांकडून विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते.
संस्थाध्यक्ष विनायक भाेंगाळे यांनी संविधानाचे महत्व ,समतावाद याचा शालेय विद्यार्थ्यांशी असलेल्या संबंधावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. संजय भाेंगाळे ,संचालीका साै. कविता कडु पाटील, विश्वस्त साै. सरीता विखेपाटील, मुख्याध्यापक श्री.शशिकांत जाेडवे, श्री. आर.गाेविंध ,शिक्षक व पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.



