पिंपरी : लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय जैन संघटना विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे 18 या प्रशालेत कु. वर्षा जगताप यांनी इ.11वी व 12 वी च्या विद्यार्थिनींसाठी भव्य आरोग्य शिबीर अंतर्गत रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपसणीचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अजित गव्हाणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , संजोग वाघेरे माजी महापौर, कविता अल्हाट महिलाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुलक्षणा शिलवंत माजी नगरसेविका,फजल शेख माजी सभापती शिक्षणमंडळ, विजय लोखंडे माजी सभापती शिक्षणमंडळ, शेरबहादूर खत्री माजी उपसभापती शिक्षणमंडळ, ज्ञानेश्वर कांबळे माजी लिडकॉम अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, पवार साहेबांनी महिलांना 50% आरक्षण दिले व युवतींसाठी राजकीय व्यासपीठ निर्माण करून त्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली,तसेच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पुढिल 15 दिवस विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार आहोत, खरतर पहिला कार्यक्रम युवती संघटनेच्या वतीने घेण्यात आला त्याबद्दल कौतुक करून अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कविता खराडे , गोरोबा गुजर,संपत पाचुंदकर, दत्तात्रय जगताप, नेहा पडवळ,शुभदा पवार ,स्वप्निल डोळस, प्रतीक अलीबागकर ,गणेश गायकवाड विशाल सोनटक्के आदि मान्यवर उपस्थित होते.



