पिंपरी : पिंपळे निलख येथिल शहिद अशोक कामठे उद्यानात हत्ती बसवण्यात आला आहे. तो हत्ती लवकरात लवकर हटवण्यात यावा कारण की पिंपळे गुरव येथिल राजमाता जिजाऊ उद्यानास त्या नावाने ओळखले जात नाही परंतु डायनासोर गार्डन या नावाने ओळखले जाते. मग त्या उद्यानास राजमाता जिजाऊचे नाव देण्याचा हेतु साध्य झाला का हा प्रश्न पडतो ? की फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी राजमाता यांचे नाव दिले हा एक संशोधनाचा विषय आहे. याच प्रमाणे पिंपळे निलख येथिल शहिद अशोक कामठे उद्यानात देखिल असाच हत्ती बसवण्यात आला आहे. त्याचे अजून हत्तीचे उद्यानाचे उद्धघाटन झाले नाही.
पालिकेच्या विविध विभागाच्या गोदामातील टाकाऊ साहित्यातून विविध 15 सुंदर कलाकृती तयार करण्यात आल्या. यामध्ये शहरभर मोरवाडी चौकात लाल घोडा, पिंपळे निलख येथे हत्ती, रावेत येथील मुकाई चौकात मावळा, पिंपळे निलख जंक्शन चौकात बिबटा, साई चौकात पान खाणारे सुरवंट, नाशिक फाटा चौकात बैल, कुदळवाडी रोटरी चौकात कार्ट टू कार, केएसबी चौकात डिजिटल बॉक्स, दिघी मॅगझिन चौकात पालखी यात्रा, निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात मोर, दुर्गादेवी टेकडीवर खार, पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात जीवनचक्र, निसर्ग, मानवाचे नाते, गुढीपाडवा अशी शिल्पे उभारण्यात आली. यातील वादात सापडलेले डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पॅरडाइज काढून टाकण्यात आले. आता त्यापाठोपाठ पिंपळे निलख येथील हत्ती शिल्प हटवण्याची मागणी होत आहे.
https://maharashtramaza.online/?p=161386
हा हत्ती काढण्यासाठी ड प्रभाग येथिल तीन ते चार वेळा जनसंवाद सभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे.परंतु त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.शहिद अशोक कामठे यांचा मान ठेवायचा असेल तर ती हत्तीची मुर्ती त्या उद्यानातून काढण्यात यावी नाही काढली तर समाजातील नागरिक पिंपळे निलख येथिल उद्यानास कामठे यांच्या नावाने न ओळखता.हत्ती उद्यान या नावाने ओळखले जाईल आणि हा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही .तरी माझी आपणास कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर उद्यानातील हत्ती हटवण्यात यावा अन्यथा मी 14 डिसेंबर 2022 रोजी शहिद अशोक कामठे उद्यान समोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करेल याची नोंद घ्यावी.
आमच्या प्रमुख मागण्या:-
1) शहिद अशोक कामठे उद्यानातील हत्ती लवकरात लवकर हटवण्यात यावा.
2) उद्यानातील पथदिव्यांची संख्या वाढवण्यात यावी.
3) सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढवावी.
वरील सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही कारावी असे निवेदन देताना रविराज काळे यांनी .मागणी केली आहे.निवेदन देताना ऋषीकेश कानवटे, अजय चव्हाण, ओमकार भोईर, नीरज सुतार इत्यादी उपस्थित होते




