पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी)- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर रोजी विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
करोनानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यापैकी काही जणांना अद्यापही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाकडून विभागीय महारोजगार मेळाव्याचे ४ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये या मेळाव्यासाठी पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक ४० पेक्षा जास्त खासगी उद्योजक सहभाग घेणार आहेत. त्यांच्याकडून सुमारे ७ हजार ३०० पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता ८ वी ९ वी १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar. mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, पुणे यांच्या वतीने उप आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
हा मेळावा रविवार दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता.
स्थळ : द न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीअम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे
संपर्क : डॉ. गणेश अंबिके ९४२२०३६६३९. श्री. विशाल डोंगरे- ८४२१९०४८५५. हेल्पलाईन क्रमांक ७५७५९८९९९९
हा रोजगार मेळावा प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी आयोजित केला आहे.




