चिंचवड : चिंचवड, रामनगर येथे एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करून तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. खुनामागील कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.
विशाल गायकवाड (वय 38 ) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी या बाबतची प्राथमिक माहिती दिली. काल (शुक्रवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास रामनगर येथे परशुराम चौकात सराईत गुन्हेगार विशाल गायकवाड याचा खून करण्यात आला. त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. गोळीबार झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.




