पुणे : इनरव्हील क्लब ऑफ रिवर साइड पुणे नेहमीच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातील गरजू तसेच वेगवेगळ्या घटकांना मदतीचा हात देत असताे. याच अनुषंगाने स्वारगेट डेपो मधील अधिकारी, महिला कर्मचारी व प्रवाशांची गरज लक्षात घेऊन क्लबच्या च्या वतीने अधिकारी व प्रवासी वर्गासाठी वॉटर पुरिफायर दोन संच त्याचप्रमाणे वॉटर चिलर संच स्वारगेट डेपोस भेट दिले. या भेटीमुळे डेपोतील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची अतिशय चांगली सोय होणार आहे.
त्याचप्रमाणे डेपोमध्ये मध्ये असणाऱ्या महिला कर्मचारी तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सॅनेटरी नॅपकिन च्या दोन मशीन डेपोमध्ये क्लबच्या वतीने बसवण्यात आल्या आहेत. या मशीन्स मुळे परगावहून येणाऱ्या महिला प्रवाशांची तसेच डेपो मधील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगली सोय झाली आहे त्यामुळे महिला वर्गाकडून तसेच सर्व प्रवाशांच्या कडून इनर व्हील ऑफ रिव्हर साईट क्लबचे चे त्याचप्रमाणे क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे डेपो च्या वतीने आभार मानून सर्व प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.
दोन्ही मशीन जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये किमतीच्या असून विविध व्यक्तींच्या, कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही मदत क्लबचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मिळवलेली आहे. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन हे टाटा पॉवरच्या स्पॉन्सरने देण्यात आले आहे. यावेळी क्लबच्या अध्यक्ष माधवी चंदन, इंटरनॅशनल पास्ट प्रेसिडेंट स्मिता पिंगळे डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे, रजिता गुप्ता ,आय एस ओ सोनल शहा, पास्ट प्रेसिडेंट सुमन मर्चंट, शारदा कनोरीया,भारती आगरवाल, निरंजना मगर या सर्वांच्या तसेच स्वारगेट डेपोतील डेपो व्यवस्थापक, इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरील सर्व संच डेपोस भेट देण्यात आले. यावेळी डेपोतील कर्मचारी अधिकारी तसेच प्रवासी उपस्थित होते.




