कामशेत:- ताजे येथील सज्जनवाडी मध्ये सभापती दत्तात्रय शेवाळे यांच्या फंडातून व विस्टिऑन व आयुष सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आज पाणी जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्धघाटन श्री दत्तात्रय नाथा शेवाळे व अमोल पाटील, सिद्धार्थ बांगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित भानुप्रताप देशमुख, दरेकांत माळी, महावीर पाटील, सूरज शेख, अजित कांबळे, सोमनाथ शिंदे, सोपान काटकर, बाळासाहेब शिरसट, व सरपंच नीलम सुतार, रेश्मा गायकवाड, सिद्धार्थ चौरे ग्राम पंचायत सदस्य, व समस्त ग्रामस्थ मंडळी ताजे जल शुद्धीकरण प्रकल्पाची संकल्पना उपसरपंच सचिन केदारी व विशेष प्रयत्न ताईबाई केदारी ग्राम. पं. सदस्य आदी जण उपस्थित होते




