चिंचवड: पवना एज्युकेशन व सोशल ट्रस्टच्या युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर येथे सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२२ ला विविध क्रीडा स्पर्धा व कमांडो ट्रेनिंग यांचे आयोजन करण्यात आले होते. नर्सरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये रनिंग रेस, रिले, कबड्डी, संगीत खुर्ची, पोटॅटो रेस, चमचा-लिंबू, डॉज बॉल इत्यादी स्पर्धांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. कमांडो ट्रेनिंगच्या अंतर्गत श्री सावंत सर व त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थ्यांना आर्चरी, रायफल शूटिंग, रॅपलिंग, बर्मा ब्रिज, लाठीकाठी, फायर फायटिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले.
प्रमुख पाहुणे अमोल थोरात, भाजपा संघटन सरचिटणीस (पिंपरी चिंचवड), रविंद्र नामदे (चापेकर स्मारक समिती सदस्य), परबत गुरुजी माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे तसेच सर्व ट्रस्टी यांच्या उपस्थितीत क्रीडा महोत्सवाचा सांगता-समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाविषयी उत्तम मार्गदर्शन केले. यावेळेस विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण झाले इयत्ता १ ली – २ री मास पी.टी. , ३ री- ४थी पॉम-पॉम डान्स, ५वी-६वी डंबेल्स व रीबीन्स, ७ वी चा लेझीम प्रात्यक्षिके सादरीकरण तसेच ८वी ते १०वीच्या मुलांचा प्ले ऍक्ट, ८वी ते १०वी मुलींनी ‘विजयी भव’ गाण्यावर स्त्रीशक्तीचे नृत्यातून सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी शाळेच्या संचालिका नगरसेविका अश्विनीताई गजानन चिंचवडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी दुवेदी, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद मेहेंदळे, सर्व शिक्षिका, कमांडो प्रशिक्षक सावंत सर व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.
या क्रीडा महोत्सवाचे नियोजन सौ. प्रियंका गोडसे, सौ. मनिषा बलकवडे, सौ. कमल पावसे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




