पिंपळे सौदागर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवस १२ डिसेंबर 2022 रोजी साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व शार्प कराटे अँड किक बॉक्सिंग स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने ‘१७ वी पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२-२३’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

‘दाखवा तुमच्यातील योद्धा’ ही थीम घेऊन खेळाडूंमधील ‘योद्ध्याला’आकार देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिनव असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, कैलास थोपटे, राजेंद्र साळुंखे, सागर कोकणे, हरिभाऊ तिकोने, श्याम जगताप, माजी नगरसेविका शीतल काटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.




