वडगाव मावळ :- कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी गोवित्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश रघुनाथ भुरुक यांची सलग दुसऱ्यांदा निवड बिनवरोध निवड करण्यात आली आहे.
कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनची शुक्रवारी(दि.९) निवडणूक पार पडली यावेळी असोसिएशनचे सदस्य पंकज गुगळे यांनी अध्यक्ष पदासाठी रमेश भुरुक यांचे नाव सुचवले त्यास ताणाजी टाकवे यांनी अनुमोदन दिले व सर्व सदस्यांनी यास संमती दर्शवली यामुळे अध्यक्ष पदी रमेश भुरुक यांची बिनवरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
तसेच उपाध्यक्ष पदी संतोष पवार व गणेश शिंदे, सचिवपदी गणपत नेवाळे व खजिनदार पदी दत्ता कोंढरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे सदस्य तानाजी टाकवे, विजय सोनी, पंकज गुगळे, गणेश गायकवाड, पप्पू शेटे, विनोद शेलार, योगी भुल, प्रवीण शिंदे, रवी साबळे, प्रवीण गायकवाड, सनी कोळेकर, सुभाष शेवाळे, बाळासाहेब कुडले, सुभाष कोंढरे, नवनाथ पवार, आकाश कोंढरे आदी उपस्थित होते.
मागील एक वर्षाच्या कार्यकाळात रमेश रघुनाथ भुरुक यांनी कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांनी संघटनेसाठी दिलेल्या योगदानाची पावती म्हणून असोसिएशन च्या सदस्यांनी पुन्हा त्यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड केली आहे.




