पिंपरी :- लोकतेने दिवंगत स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सोमवारी (दि. १२) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, सुरेश वाघळकर, सुभाष पाटील, सखाराम ढाकणे, विजय रोकडे, मधुकर पाटील, विवेकानंद थत्ते आणि उन्नति विठाई वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी कुंदाताई भिसे म्हणाल्या, भाजपच्या सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी म्हणून स्व. गोपीनाथ मुंडे हे आजही सर्वांना प्रेरणादायी आहेत. १२ डिसेंबर हा गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आयुष्य वेचणाऱ्या या नेत्याची आज सर्वत्र जयंती उत्साहात साजरी होत आहे.
एकेकाळी राजकारणाचा पिंड नसतानाही त्यांनी भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम केले. त्यामुळेच आजही त्यांच्याकडे बहुजनांचा चेहरा म्हणूनच पहिले जाते.




