पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरांमधील महत्वपूर्ण म्हणून ओळखली जाणारी जीवनदायी पवना नदी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून त्या प्रदूषित पाण्यामुळे नदीमधील जलचर प्राणी व मासे इत्यादी मृत्युमुखी पडत असून महानगरपालिका प्रशासन या संदर्भात कोणत्याही प्रकारचे गांभीर्याने उपाययोजना करत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडत असून याप्रकरणी कसुन चौकशी करून त्यावर कायमस्वरूपी ऊपाययोजना करुन कठोर कारवाई करण्यात यावी व परत अशा प्रकारची घटना घडू नये याची दक्षता महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात यावी.

मागील अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या घटना घडल्या असून वेळोवेळी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागास तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्र व्यवहार, निवेदने व आंदोलने करून कारवाई करण्याची सूचना थेरगाव सोशल फाउंडेशन च्या मार्फत करण्यात आली होती तरीपण महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग या घटनांना आवर घालू शकले नसून हे महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे सर्वात मोठे अपयश आहे.

पुढील काळात यावर पालिकेने कायमस्वरुपी तोडगा काढला नाहीतर शहरातील सर्व पर्यावरणवादी संघटनेच्या मोठया रोषास सामोरे जावे लागेल व त्यास सर्वस्वी पिंपरी चिंचवड महनगरपालिका जवाबदार असेल असा ईशारा पर्यावरण विभागाचे मुख्य अधिकारी संजय कुलकर्णी यांना देण्यात आला आहे यावेळी सर्व फाउंडेशनचे अनिकेत प्रभू, राहुल सरवदे, गणेश डांगे, अमोल शिंदे, प्रकाश गायकवाड, शंतनु तेलंग इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




