भोसरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून दरवर्षी आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने अंतिम फेरीमध्ये हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले आहे.
सलग दोन वर्ष राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या यशात दैदीप्यमान भर घातली आहे. या संघातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे, त्यांचे प्रशिक्षक, शिक्षक सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.




