चिंचवड: काळभोरनगर सूर्योदय कॉंम्पलेक्स, ऐश्वर्म सोसाइटी, मनपा शाळा लगत असलेल्या नाल्यातुन रोज़ केमिकल विरहीत पानी सोडले जाते. त्यामुळे परिसरात मागील काही महिन्यांपासून परिसरातील नागरिकांना वासाची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. येथील जेष्ठ नागरीकांना श्वसनाचा त्रास होत आहे. खोकला, घसा खवखवने, डोळे लाल होने, डोक जड़ येणे अशा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार केला तरीही यावरती काहीही तोडगा निघाला नाही.
त्यामुळे पालिका प्रशासनाने सार्वजनिक ओढ्या नाल्यात कोणते कंपनी दुर्गंधीयुक्त व केमिकलचे पाणी थेट सोडून देते याची तपासणी करून यावरती तातडीने कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याची होणारा खेळ थांबवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याच नाल्यावरून दोन ठिकाणी शाळेचे विद्यार्थी दररोज हजारांच्या संख्येने प्रवास करतात त्यामुळे याचा थेट परिणाम शालेय विद्यार्थ्यांवरती ही होताना दिसत आहे.




