इंदोरी (वार्ताहर) :- इंदोरी मावळ येथे सरपंच पदाची निवडणूक शांततेत पार पडली. सदर मतदान हे इंदोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सरस्वती विद्या मंदिर येथे पार पडले
इंदोरी येथे एकूण 6 वार्ड आहेत सर्व मिळून एकूण ६ हजार ३०६ मतदार आहेत यातील सुमारे ४ हजार ४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सुमारे ७०.३५ टक्के मतदान इंदोरी येथे सरपंच पदासाठी झाले.
सदर निवडणूक मध्ये सरपंच पदा साठी एकूण तीन उमेदवार उभे होते त्यात अंकुश ढोरे, मधुकर ढोरे, शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली




