वडगाव मावळ :- ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी (दि.१८) मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ७९.८० टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
मावळातील इंदोरी,वरसोली, कुणे नामा, सवळा, निगडे, गोडुंब्रे, भोयरे, देवले या गावांच्या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांनी सकाळी साडेसात वाजल्या पासूनच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. या आठ गावांच्या ग्रामपंचायतीसाठी एकूण १४ हजार ५७७ मतदान होते त्यात ७ हजार ९३ महिला व ७ हजार ४८४ पुरुष मतदार होते. यापैकी एकूण ११ हजार ६३२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला यात ५ हजार ६०१ महिला व ६ हजार ३१ पुरुषांचा समावेश आहे.
- इंदोरी ग्रामपंचायतीत ७०.३६ टक्के मतदान झाले.
- वरसोली ग्रामपंचायत ८५.०४ टक्के मतदान झाले.
- कुने नामा ग्रामपंचायत ८४.८९ टक्के मतदान झाले.
- सवळा ग्रामपंचायत ८२.०२ टक्के मतदान झाले.
- निगडे ग्रामपंचायतीत ९३.१० टक्के मतदान झाले.
- गोडूंब्रे ग्रामपंचायतीत ९०.९० टक्के मतदान झाले.
- भोयरे ग्रामपंचायत ९३.९२ टक्के मतदान झाले.
- देवले ग्रामपंचायत ७९.४५ टक्के मतदान झाले.




