- वरसोली ग्रुपग्रामपंचातीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काॕग्रेसचे संजय खांडेभरड यांनी मारली बाजी
कार्ला- वरसोली पांगळोली ग्रुपग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार जागांवर बिनविरोध निवड झाल्या होत्या तर सरपंच पदासाठी दुहेरी लढत होती यामध्ये सरपंचपदी राष्ट्रवादी काॕग्रेसचे सरचिटणीस संजय बबन खांडेभरड यांनी उपसरपंच तर पत्नी प्रथम लोकनियुक्त सरपंच व आता दुसऱ्यांदा ७०९ मते मिळवत पुन्हा लोकनियुक्त सरपंचपद मिळवत बाजी मारली आहे.
या आगोदर मंदा नामदेव पाटेकर, मीना पांडूरंग शिद , सिता गंगाराम ठोंबरे व राहुल मारुती सुतार हे बिनविरोध निवडून आले होते. वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंच संजय खांडेभरड हे मागील दहा वर्षापासून गावचे माजी उपसरपंच तर त्यांच्या पत्नी सारिका खांडेभरड ह्या मागील पंचवार्षिक काळात गावच्या सरपंच होत्या. त्यांनी केलेल्या विकासकामांना मतदारांनी साथ दिली.
ग्रामपंचायत सदस्य पदामध्ये निवडून आलेले उमेदवार
विजय बाबू महाडिक ३५५
नारायण राजाराम कुटे १९२ मते
रजनी राजु कुटे ४३१ मते
अरविंद अशोक बालगुडे ३०३ मते
नलिनी दत्ता खांडेभरड २२२ मते घेत मिळवत विजयी झाले. संजय खांडेभरड यांची निवडझाल्यानंतर वडगाव व वरसोली पांगळोली येथे ग्रामस्थांकडून भंडारा उधळण करत जल्लोष केला.




