कार्ला- : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कार्ल्याच्या आई एकविरादेवी दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी आज कार्ला गडावर येऊन ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी आई देवीची ओटी भरत दर्शन घेतले .
यावेळी त्यांच्या समवेत त्याची आई सौ . पाटणकर व भगिनी सौ .सरदेसाई तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील , पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे , शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड , वेहेरगावचे सामाजिक कार्यक्रते संदीप देवकर , पोलीस पाटील अनिल पडवळ, पुजारी संजय गोविलकर ,संजय देशमुख,राजु देवकर एकविरादेवी मंदिर गुरव प्रतिनिधी उपस्थित होते .




