देहूरोड ( वार्ताहर ) देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नवीन बांधकामे आणि जुन्या बांधकामांच्या दुरुस्तीच्या प्रश्न मार्गी लावल्याशिवाय वार्षिक मूल्यांकनाची ( मिळकत कर व पाणी आकार ) वाढ करू नये. या प्रमुख मागणीसह नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरविणीच्या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
प्राथमिक शाळेचे बांधकाम करणे.कोटेश्वर वाडी येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारणे.स्मशानभूमीतील दहन जाळी दुरुस्त करणे,विद्युत दाहिनी सुरू करणे,बगीचा सुशोभीकरण करणे,पिण्याच्या पाण्याचे सुविधा करणे. देहू – देहूरोड दरम्यानचा मुख्य रस्ता तसेच हद्दीतील सर्व अंतर्गत खड्डेमय रस्ता दुरुस्त करणे.
साईड पट्ट्यांना मुरमीकरण करणे. नादुरुस्त स्वच्छतागृह,विद्युत पोल,हायमास्क,भूमिगत जलवाहिनी,संरक्षक भिंत दुरुस्त करणे,भूमिगत केबल,नवीन पिण्याचे पाईपलाईन,ड्रेनेज पाईपलाईन टाकणे,गटार बांधणे.ट्रांसफार्मर उभारणे.कचरा कुंड्या वाढवून साफसफाई करणे.नियमित दाबाने पाणीपुरवठा पुरविणे,बाजारपेठेतील ध्वजारोहण पोल दुरुस्त करणे आदी मागण्याचे निवेदन शहराध्यक्ष प्रवीण झेंडे,युवक अध्यक्ष आशिष बंसल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.माजी शहराध्यक्ष ऍड कृष्णा दाभोळे,किशोर गाथाडे,तानाजी काळभोर,बाळासाहेब जाधव,जाफर शेख,विजय पवार,दीनानाथ चौरसिया,दिनेश बालघरे,दीपक चौगुले,हिरामण साळुंखे, विजय पवार ,ज्योती वैरागर,सरला गायकवाड तेजस कुंभार,सुमित गायकवाड,अभिषेक म्हसे रोहन जगदाळे संदीप जावळे आदी शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.




