पिंपरी : नागपूर येथे राज्यातील विविध प्रश्नावरती हिवाळी अधिवेशन मध्ये चर्चा होत आहे अशीच चर्चा पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम वर लावलेल्या शास्तीकराबाबत झाली. या शास्तीकराची विषय भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मांडताना लक्षवेधी मांडली याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला जाईल अशी केवळ घोषणा केली.
शास्तीकर माफ करण्याबाबत राज्यातील
शिंदे फडणवीस सरकारने (GR)कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवडकरांना दिलेले हे गाजर आहे. २०१७ मध्ये पालिकेच्या चाव्या आमच्या हाती द्या १०० दिवसात प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तिकराचा प्रश्न निकाली काढू म्हणणाऱ्या फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड करांच्या तोंडाला पाने पुसली. देशात मागील दोन पंचवार्षिक सत्तेत असणाऱ्या भाजपकडून कोणताही ठोस निर्णय अथवा जीआर काढण्यात आलेला नाही. भाजपकडून निवडणुकात अनेक चुनावी जमले समोर आले आहेत. यातच त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. निवडणुकी पूर्वी ठोस निर्णय घेतला तर ठीक अन्यथा पिंपरी चिंचवडची जनता निवडणुकीत भाजपला जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया घर बचाव चळवळ, पिंपरी चिंचवडचे नेते धनाजी येळकर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.




