पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक प्रगतीत महत्वाचा वाटा हा इथल्या औद्योगिक आणि आयटी कंपन्यांचा आहे. पण यातील अनेक कंपन्या ट्रॅफिक प्रोब्लेममुळे हैदराबाद आणि तेलंगणाची राजधानी अमरावती याठिकाणी स्थलांतरित होत आहेत. अतिशय चिंताजनक असलेला हा विषय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात मांडला.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील आणि विशेषता हिंजवडी आयटी परिसरात ट्रॅफिक समस्येसह इतर अनेक असुविधांमुळे येथील नागरिक, संस्था, कंपन्या आणि एकंदरीत सर्वांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे रोजगार हळूहळू कमी होत आहे तर दुसरीकडे कंपन्या स्थलांतरित होत आहेत हे चिंताजनक आहे. शहरातील नागरिकांना त्रास होणे योग्य नाही. तसेच आपल्या शहराच्या आर्थिक प्रगतीचा कणा असलेल्या कंपन्या स्थलांतरित होण्यामुळे येथील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होऊ शकतो. राज्यातून प्रत्येक भागातील व्यक्ती व्यवसाया नोकरीसाठी पुणे पिंपरी चिंचवड शहरात स्थिरावला आहे. त्यामुळे येथील उद्योगधंदे कमी झाले तर त्याचा थेट परिणाम रोजगार वरती होणार आहे. त्यामुळे कंपन्या परराज्य स्थलांतरित होऊ नये यासाठी सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ठोस उपाययोजना केली पाहिजे. असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हिंजवडीतील वाहतूक समस्येचे व्यथा अजित पवार यांनी अधिवेशनात भूमिका मांडून पक्षीय भेद विसरून एकत्र येऊन या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे म्हटले आहे. अजितदादा पवार यांच्यासाठी पिंपरी चिंचवड नेहमीच प्राधान्यक्रमावर राहिले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.




