कराड उत्तर विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायतींमध्ये भाजपने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. या कामगिरीत सातत्य ठेवा. आम्ही तुम्हाला ताकद देत जावू. कराड उत्तरमध्ये विकासाची गंगा आणू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे नेते मनोजदादा घोरपडे यांना दिली. मनोजदादा घोरपडे व संग्राम घोरपडे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी घोरपडे यांचे अभिनंदन केले.
ना. देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील भाजपच्या पक्ष संघटनेचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीत मिळालेले यश अभिमानास्पद असून आम्ही तुम्हाला आणखी ताकद देवू. तुम्ही भाजप वाढवत रहा, अशा सूचना फडणवीस यांनी घोरपडे यांना दिल्या. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आणू, अशी ग्वाहीही ना. फडणवीस यांनी घोरपडे बंधूंना दिली.




