पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर व परिसरात सरत्या वर्षात निरोप देताना नवीन वर्षाचे जल्लोष स्वागत करण्यात आले. शनिवार व रविवार सलग दोन दिवस सुट्टी आल्याने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक हॉटेल रिसॉर्ट मध्ये एकत्रित आलेले दिसून आले. दोन दिवस लागून सुट्ट्या आल्याने त्याचा पुरेपूर आनंद घेत नववर्षाचा नवसंकल्प करत सरत्या वर्षाला निरोप दिला तर, नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. गेली दोन वर्षे करोनामुळे सण-उत्सव साजरे करता आले नव्हते. यंदा मात्र, निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता.
पिंपरी चिंचवड शहरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नागरिकांनी स्वतः पढाकार घेऊन केले. तर, हॉटेल, रिसॉर्टमध्ये विविध ऑफर देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहात भर पडला. व्हेज नॉनव्हेज पदार्थांबरोबरच केकला मोठी मागणी होती. नवीन वर्षांचे स्वागत अनेकांनी केक केपून केले. तर, काही संस्था संघटनांनी मध्यरात्रीच दूधाचे वाटप केले.
तरुणाईचा जल्लोष….
तरुणाईने खास पार्टीचे आयोजन केले होते. रात्री उशिरापर्यंत गीतांवर तरुणाई थिरकली. अनेकांनी आपल्या घराच्या टेरेसवर, पार्किंगमध्ये, बागेत पार्टी आयोजित केली होती. ग्राहकांना सेवा पुरविता यावी, यासाठी रात्री उशिरापर्यंत जल्लोषात करण्यासाठी हॉटेल आणि खाद्य पदार्थ पुरविणारी दुकाने, स्टॉल सुरू ठेवण्यात आली होती. तसेच विविध प्रकारच्या ऑफर असल्याने अगोदरच बुकिंग करून या ऑफरचा लाभ घेतला.
नववर्षाचे स्वागतसाठी अनेक नागरिक शहराबाहेर…
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातून बहुसंख्य पर्यटकानी समुद्रकिनारी असणाऱ्या स्थळांना पसंती दिली आहे. त्यात कोकणसह, धम्माल करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे समुद्र किनारी आणि हिलस्टेशनवरील एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, गुहागर, दिवेआगार, तारकर्ली, वेंगुर्ला, देवगड तसेच गोवा, दिल्लीचे, तसेच देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांचे नागरिकानी दोन महिन्यांपूर्वीच बुक केली होती.




