महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा व ठाण्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराजे देसाई यांचा हस्ते ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित ६४ सरपंच आणि ४२६ सदस्यांचा आज दौलतनगर मरळी येथे सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह पक्षाचे सर्व नवनिर्वाचित सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



