पिंपरी : ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशी विकासाची ख्याती असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे मेट्रो सिटी मध्ये बदलली. ते शहरातील ज्येष्ठ नेते आमदार लक्ष्मण जगताप कुटुंबीयांच्या साक्षीने. भाऊंच्या दूरदृष्टी खाली गाव ते स्मार्ट सिटी अशी परिवर्तनाची नांदी शहराला दिली. अशा उद्योग नगरीचा आणि जगताप कुटुंबाचा एक खंदा शिलेदार आज आपल्यातून अनंतात विलन होणार आहे या भावनेने शहरातील अनेक चाहता वर्ग हळहळला आहे. जगताप यांचे निधनाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. जगताप यांचे पार्थिव देह दुपारी २ ते ४:३० वाजेपर्यंत लोकांना दर्शन घेण्यासाठी पिंपळे गुरव येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरव स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी कार्यक्रम होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा ‘‘सारथी’’ म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांचा नावलौकिक आहे. लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टर्म आमदार आहेत. २००९ ला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी झालेले आहेत. त्यापूर्वी २००४ ला ते विधान परिषदेवर निवडून आले होते. २०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. सांगवीतील गणेश को ऑपरेटीव्ह बँक, न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे ते संस्थापक, तर पतंजली योगपीठ, हरिव्दारचे ते संस्थापक सदस्य होते. सद्गगुरु वामनराव पै जीवन विद्या मिशनचे ते मुख्य सल्लागार आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे आजीव सदस्य होते.
२०१७ मधील महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड झाली. ‘राष्ट्रवादी हटाव, पिंपरी-चिंचवड बचाव’ असा नारा देत त्यांनी राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. त्यावेळीच त्यांनी आपली नेतृत्वक्षमता अधोरेखित केली. त्यामुळे त्यांना मानणारा चाहतावर्ग आणखीनच वाढला. त्याचा भाजपला पुढील काळात नक्कीच फायदा झाला. त्यामुळे त्यांच्या शब्दाचे त्यातील व राज्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय वजन तितक्याच ताकदीचे होते.
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदावरून ते स्वतःहून पायउतार झाले असले तरी शहराचे खरे कारभारी तेच राहिले. गेली ३५ वर्षे ते राजकारणात असताना १९८६ ते २००६ अशी सलग २० वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष झाले. २००२ मध्ये महापौर झाले. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेत एक वेळा आणि विधानसभेत सलग तीन वेळा आमदारकी भूषवली. २०१४ ची लोकसभा निवडणूक ते शेतकरी कामगार पक्षाकडून लढले. मात्र, त्यात ते पराभूत झाले.शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला.
याशिवाय आमदार लक्ष्मण जगताप यांना सायकलिंग, पोहणे आणि घोडेस्वारी हे मोठे छंद होते. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला “महाराष्ट्र माझा” चा अखेरचा सलाम…..



