गोळेश्वर ता.कराड येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून 1 कोटी 2 लाख रुपये व खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून आठ लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभ आज संपन्न झाला.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर, श्री.मनोहर शिंदे-भाऊ, श्री.जयवंतराव जगताप, श्री.शिवराज मोरे, श्री.इंद्रजित चव्हाण, श्री.नामदेव पाटील-आप्पा, सौ.रुपालीताई जाधव-पाटील, सौ.नूतन कदम, श्री.शिवाजी जाधव, श्री.संजय जाधव, अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कराड दक्षिण मतदारसंघातील लोकांनी जो विचार जपला आहे. त्या विचाराचे पावित्र्य दुषित होणार नाही, याची काळजी लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. यातून स्फूर्ती घेवून यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील – उंडाळकर यांच्यासह मी व खा. श्रीनिवास पाटील यांनी नेतृत्व करत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जपणूक केली आहे. या मतदारसंघाचा इतिहास जपूया, असे सांगून बहुजन व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामध्ये कोणी विष कालवू नये, असेही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.




