वडगाव मावळ : कान्हेफाटा येथील मुंबई पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीस जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दीपक पंडित टोंपे व अमोल गोडे असे अपघात गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दीपक पंडित टोंपे व अमोल गोडे हे दोघेजण मंगळवारी (दि. १०) सकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील दुचाकी ( क्रमांक एमएच १४ जेजी ५५८१) वरुन मुंबई पुणे महामार्गाने मोहितेवाडी साते येथे जात असताना कान्हे फाटा येथे त्यांच्या दुचकीस एका टेम्पोने (क्रमांक एमएच १४ बीजे २०१८) जोरात धडक दिल्याने अपघात झाला आहे. या आपघातातील पुढील तपास पोलीस हवालदार आशिष काळे हे करत आहेत.




