पिंपरी ११ जानेवारी :- घरात जबरदस्तीने प्रवेश करत भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवत किराणा दुकानदाराला लुटले. फिर्यादी व साक्षिदार यांना पिस्तुल व चाकुचा धाक दाखवीला. फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच घरातील इतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १०,८५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी चोरांनी चोरून नेला आहे.
ही घटना (दि. १०) रोजी दुपारी १:४५ वा. सुमा. ओ/१, फलॅट नं. १०२, फ्लोरा सिटी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
फिर्यादी दिलीप चंपालाल मुथ्था (वय ५६ वर्षे, व्यवसाय किराणा दुकान, रा. तळेगाव दाभाडे) यांनी आरोपी अनोळखी पाच जणांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.




