पुणे : पुण्यातील एका भीषण लिफ्ट दुर्घटनेतून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार थोडक्यात बचावले होते. शहरातील हर्डीकर हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली पडली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्य तिघे लिफ्टमध्ये होते. अपघातातून हे लोक बचावले आणि जखमी न होता लिफ्टमधून बाहेर आले.
रविवारी बारामती येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी या घटनेचे कथन केले, जिथे ते म्हणाले की, पुण्यातील एका रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. याची जाहीर स्पष्टीकरण त्यांनी एक दिवसानंतर आपल्या जाहीर कार्यक्रमात लोकांना दिले.
मागील काही दिवसापासून अनेक आमदारांच्या गाडींना अपघाताचे प्रकार सुरू आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही अपघात घडला. मात्र, कोणत्याही प्रकारचे दुर्दैवी घटना घडली नाही. अजित पवार यांच्या घटनेची बातमी त्यांनी स्वतः बारामती येथे सांगितली. पिंपरी चिंचवडमधील एका खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी हा प्रकार घडला. मात्र, उद्घाटन वेळी स्थानिक उपस्थित नागरिकांना यांची कल्पना ही नव्हती. काही निवडक कार्यकर्त्यांना याची माहिती होती मात्र माध्यमांना याची माहिती लागू दिली नाही.




