पिंपरी : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेते महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे यांचा चिचंवड विधानसभेचे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे नेते मा. विरोधी पक्षनेते नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुणे येथे झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी पुणे जिल्ह्याचा सुपुत्र पैलवान कु. शिवराज राक्षे ठरला. त्यानंतर अक्षय यांच्यावर अनेक घटकातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज चिचंवड विधानसभेचे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे नेते मा. विरोधी पक्षनेते नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते राक्षे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




