पिंपरी : इंद्रायणी नदी पात्रात जलपर्णी वाढल्याने चऱ्होली बुद्रुक परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. जलपर्णीमुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर यांनी पालिका प्रशासनाकडे केले आहे.
चऱ्होली बुद्रुक परिसरातून अनेक नाल्यातून येणारे सांडपाणी थेट नदीपत्रात मिसळले जाते. याने नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. नदी परिसरात चिलटे माश्या, डास वाढल्याने आजुबाजुला रोगराईत वाढ झाली आहे. पालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट गावांना विकास कामात कायम दुय्यम स्थान दिले जाते. जलपर्णी वाढल्याने रहिवाशांना अहोरात्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जलपर्णीवर डास चिलटे माश्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात महापालिकेकडून स्वच्छतेवर भर द्यावा. नागरिकांच्या आरोग्य समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे साथीचे आजार पसरू लागले आहे. विशेषत जेष्ठ नागरिक लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याने महापालिकेच्या संबंधित यंत्रणे लवकरात लवकर इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढावी अशी मागणी ज्योती तापकीर यांनी केली आहे.




