भोसरी (वार्ताहर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आळंदी येथील गरुड स्तंभ बंधाऱ्या जवळील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
येथील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याकरिता बोटीचा वापर करत कर्मचारी वर्ग ही जलपर्णी काढण्यासाठी कार्यरत आहेत.तसेच डुडूळगाव येथील इंद्रायणी नदीपात्रात सुद्धा जेसीबी मशीन द्वारे जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे.
याबाबत माहिती सुपर वायझर नंदकुमार तरस यांनी दिली.बंधाऱ्या जवळील जलपर्णी काढल्यामुळे तेथील जलचर प्राण्यांना पुरेसा प्राणवायू मिळणार असून जलचर जीव सृष्टी वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे इंद्रायणी मध्ये पाच राहतील पाणी खेळते राहणार आहे. व जलपर्णीचा दुर्गंधी वास यांच्यापासून आळंदीकरांसह बालकांचा देखील बचाव होणार आहे.




