मुंबई– अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. या रिपोर्टमुळे अदानी समुहाचा मोठा तोटा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे, यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात देशपातळीवर चर्चा सुरू आहे. ज्या परदेशी कंपनीने आरोप केला आहे. अदानी ग्रुपनेही ४०० पानांचे यावर उत्तर दिले आहे. आज भारतीय नागरिक म्हणून सर्वात श्रीमंत म्हणून गणली जाणारी व्यक्ती आहे. यांच्या संदर्भात सर्व होत असताना केंद्र सरकारने यावर हस्तक्षेप करायला पाहिजे, पत्रक काढून परिस्थिती सांगितली पाहिजे. एवढ सगळ होत असताना केंद्र सरकार या संदर्भात का शांत बसले आहे. वस्तुस्थिती काय आहे, ती केंद्राने लोकांना सांगायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
अदानी समुहाची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वांना बसणार आहे. त्यामुळे केंद्राने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. सध्या देशातील सर्वजण या प्रकरणावर बुचकळ्यात पडले आहेत. आपल्या देशासह बाहेरच्या देशातही अदानी समुहाची मोठी गुंतवणूक आहे, त्यामुळे केंद्राची वत्त विभागाने यावर स्पष्टीकरण देऊन लोकांना सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
गेल्या दोन दिवसापूर्वी अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडनबर्ग या संस्थेने आरोप केले. यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला, अदानी समुहाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज अदानी समुहाने हिंडनबर्ग संस्थेला ४१३ पानांचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर यावर हिंडनबर्गने आपली प्रतिक्रिया देत अदानी समुहावर पुन्हा आरोप केले आहेत. भारत एक दोलायमान लोकशाही आणि उदयोन्मुख महासत्ता आहे, अदानी समूह लूट करून भारताचे भविष्य रोखत आहे, असा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे.
अदानी समुहाने हिंडनबर्ग रिसर्चवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादाने फसवणूक थांबवता येत नाही. जे आपल्यावर केलेल्या प्रत्येक मोठ्या आरोपाकडे दुर्लक्ष करते. अदानी समूहाने “मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटविण्याचा आणि त्याऐवजी राष्ट्रवादी कथेला चालना देण्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला”, असंही हिडेनबर्गने म्हटले आहे.




