पिंपरी : चिखली येथील देहू आळंदी BRTS रोडचे पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नवीन प्लास्टिकमिक्स डांबरी रस्ता तयार करण्यासाठी लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीला तात्पुरती परवानगी दिली. त्यानुसार पाटीलनगर येथे १०० मीटर नमुना रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र असे प्लास्टिक मिक्स रस्त्याची खरी गरज खेड्यातील पांणद रस्त्याला सर्वाधिक आहे. शहरात वारंवार रस्त्याची खोदाई केली जाते. ड्रेनेज, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा पाईप लाईन, स्मार्ट सिटीतील कामे, गॅस पाईपलाईन आदी अनेक कामे वारंवार केली जातात. त्यामुळे टिकाऊ वाटणाऱ्या प्लास्टिक रस्त्याचा घाट शहरात घालू नये. की यामध्ये कोणाची आर्थिक देवाणघेवाणातून याचा घाट घातला जातोय अशा संशय तयार होताना दिसत आहे.
प्लास्टिकमिक्स डांबरी रोडची निर्मिती देशातील दक्षिणात्य राज्यांमध्ये सर्वाधिक केली जाते. डांबरामध्ये प्लास्टिकचा वापर केल्यामुळे पर्यावरणास घातक असणारे प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. हे रोड बराच काळ टिकणारे असतात. त्याच्यामध्ये शहरी भागातील जमा झालेले वरती नवीन टेक्नॉलॉजी वापरून त्याचे रिसायकलिंग करून डांबरीकरणांमध्ये IRC: SP: 98: 2013 हे मानक प्रमाणे प्लास्टिक वापर करण्यात येते. ते प्लास्टिक डांबर प्लांट वरती मिक्स करून रोड बनविण्यासाठी पुनर्वापर केला आहे. या रोडचा दर्जा बराच काळ चांगला राहतो. प्लास्टिकमिक्स डांबरी रोड पावसामुळे लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे याची खरी चाचणी अथवा रस्त्याचा वापर खेड्यातील पाणंद रस्त्यासाठी प्रथम प्राधांन्याने करावे.
नवकल्पना सार्वत्रिक पातळीवर राबवायला प्रशासकीय इच्छा आणि शक्ती लागते. मात्र नव्या संशोधनाबद्दल लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीने प्लास्टिक मिक्स डांबरी रस्ताचा नमुना पाहिल्यादा ग्रामीण भागात करावी. इंडियन रोड काँग्रेसने प्लॅस्टिक रोड तंत्रज्ञानाच्या वापरासाठी IRC: SP: 98: 2013 हे मानक जारी केले आहे. 2015 मध्ये, केंद्र सरकारने शहरी भागातील बिटुमेन रस्त्यांसाठी हॉट मिक्ससह प्लास्टिक वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. कचरा प्लॅस्टिक उपलब्ध न झाल्यास, रस्ते विकासकाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून बिटुमेन-फक्त रस्त्यांसाठी मंजुरी दिली. अशा रस्त्यामुळे शहरी परिसरात निर्माण होणारे प्लास्टिकचे पुनर्वापर होऊन त्याचा उपयोग ग्रामीण भागात पक्के व टिकाऊ रस्ते बनवण्यासाठी होणार आहे.
विशेषतः पांणद रस्ते किंवा पांद प्रामुख्याने शेतीला लागणारी यंत्रसामुग्री, शेती अवजारे व इतर आवश्यक साधने शेतापर्यंत नेता यावीत तसेच शेतकऱ्यांना शेतमाल बाजारापर्यंत पोहोचविणे सुलभ व्हावे, यासाठी तयार केलेले ‘कच्चे रस्ते’ असतात. मात्र प्लास्टिक मिक्स रस्ते तयार झाल्यास भला शेतकरी माणूस शेतमजुरांना/वाटसरुंना आपल्या शेतातून बाजारात जाणारा शेतीमाल चिखल, माती, दगडधोंडे व काट्याकुट्यांचे अडथळे तुडवत जाणारा त्रास कायमचा निकाली निघेल. बळीराजाला हक्काचा सार्वजनिक रस्ता तयार होऊन देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला जाणार आहे.



