पुणेः अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकाबद्दल संभाजी भिडे यांनी आज कडक प्रतिक्रिया दिली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन समुद्रामध्ये स्मारक करण्याचा बेशरमपणा करु नये, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
जुन्नर येथे आयोजित गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले की, आपल्याकडे आधीच खूप पुतळे आहेत. त्यात आणखी अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभा करु बेशरमपणा करु नये.




