पिंपरी : संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघ प्रेस्टीज प्लाझा आकुर्डी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविकात प्रवीण कदम म्हणाले महाविकास आघाडीच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करणार असतील तर ती निवडणूक संभाजी ब्रिगेड ताकदिनीशी लढणार.या बैठकीसाठी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेते प्रदेश संघटक इंजि.मनोज कुमार गायकवाड व तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मा.अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच मराठा सेवा संघाचे उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव सर व मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे सर हे या बैठकीसाठी उपस्थित होते.
या बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना वंदन करून सुरुवात झाली व तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या बांधणी संदर्भात चर्चा करून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.संभाजी ब्रिगेडचे पुढे पदवीधरचे नेते इंजि.मनोजकुमार गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणारच अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करत उपस्थिताना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी उपस्थिताना विधानसभा मतदारसंघातील एक बुथ टेन युथ ही संकल्पना सांगून कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रवर्त केले. व तसेच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा निवडणुक बिनविरोध होऊ देणार नाही.असे स्पष्ट करताच उपस्थितांमधून चार लोकांनी विधानसभा निवडणुकीसाठी उत्सुकता दाखवलेली आहे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी चिंचवड विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत असे दर्शविले, नंतर मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव सर यांनीही संभाजी ब्रिगेडच्या तिकिटावरती उमेदवारी घेऊन लढण्यासाठी इच्छुक आहोत असे दाखवलं प्रकाश जाधव सरांनी इच्छुक आहे म्हणत ऊभे राहिले त्यावेळेस उपस्थितामधून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रकाश जाधव हे सहकार क्षेत्रामध्ये नामवंत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्था, मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, धर्मवीर संभाजी बँक अशा विविध पतसंस्था बँका यांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचं खूप मोठं काम प्रकाश जाधव यांनी केले आहे शिवश्री प्रकाश जाधव हे व्यवसायाने शिक्षक आहेत दरवर्षी साडेसातशे ते 1000 विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये शिकतात, 25 वर्षापासून ते कोचिंग क्लासेस घेत आहेत ज्यांचं जनसंपर्क दांडगा असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमधून त्यांच्या नावाला प्रथम पसंती देण्याची विनंती वरिष्ठाकडे करण्यात आलेली आहे.तदनंतर शहर सचिव श्रीकांत गोरे यांनी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
महिला मधून सांगवीच्या रहिवासी शोभा जगताप याही चिंचवड विधानसभा पोटनिवडनुकीसाठी इच्छुक आहेत अशी माहिती दिली.या बैठकीसाठी शहर कार्याध्यक्ष आप्पा चांदवडे, शहर सचिव श्रीकांत गोरे ,ऑटो रिक्षा संघटना शहराध्यक्ष नारायण बिराजदार ,चिंचवड विधानसभा मतदारसंघ समन्वयक निखिल गणूचे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष यश गोरे, शहर संघटक सतीश मर्दानघावटे, एजाज शेख ,जगदीश दूधभाते सहसचिव सदाशिव लोभे, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागाचे अध्यक्ष स्मिताताई म्हसकर, संभाजी ब्रिगेडचे व जिजाऊ ब्रिगेडचे,मराठा सेवा संघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




