पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात एकमेव आमदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर टाकलेल्या पोस्टमुळे शहरात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बनसोडे यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बनसोडे यांनी एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यावरून अण्णा बनसोडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकल्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बनसोडे यांनी एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यावरून अण्णा बनसोडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन ही पोस्ट लिहिली असल्याचं दिसत आहे. पोस्टमधून शिंदे गटात जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. बनसोडे यांनी शिंदे यांना भाई असे संबोधलं आहे. तसेच काही तरी नवीन सुरू करणार असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जेव्हा नवीन काही तरी सुरू करू तेव्हा आपलीच चर्चा होणार असल्याचा दावा त्यांनी या पोस्टमधून केला आहे. त्यावरून आमदार अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीला धक्का देणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नेमकी काय आहे पोस्ट?
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना, त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे..माननीय आमदार अण्णा साहेब बनसोडे. राजकरणापलीकडची मैत्री, असं या फेसबुक पोस्टमधून म्हटलं आहे. ही पोस्ट लिहून बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे. तसेच पोस्टवर BHAI & BOSS हे दोन हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.




