चिंचवड : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभेतील पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट समोर आला आहे. 2019 च्या निवडणुकीत सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी माघारी न घेतल्यामुळे पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी देत प्रचारही सुरू केला आहे.. असं असतांना शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार जगताप व महाविकास आघाडीचे उमेदवार काटे यांच्यात कलाटे मैदानात उतरल्याने डोकेदुखी वाढणार आहे.
राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी मनधरणी केली होती. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडूनही प्रयत्न करण्यात आले होते मात्र सर्व प्रयत्नावर पाणी फिरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, भाजप आणि अपक्ष असा सरळ तिरंगी लढतीचा सामना होणार आहे. उद्धव ठाकरे यांना राहुल कलाटे यांची उमेदवारी माघे घेण्यासाठी कलाटे यांची भेट घेण्यास सचिन आहेत यांनी भेट घेतली होती.
सचिन अहिर हे राहुल कलाटे आणि उद्धव ठाकरे यांचे फोन बोलणं करून दिले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः कलाटे यांचा उमेदवारी अर्ज माघे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. दुसरीकडे राहुल कलाटे यांनीही निवडणुकीत माघार घेणार नाही अशीच भूमिका कायम ठेवली होती. आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची शेवटची मुदत होती मात्र मदतीपूर्वी राहुल कलाटे यांनी माघारी घेतली नसल्याने चित्र स्पष्ट झाले आहे.




