पिंपरी :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचार प्रमुखपदी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज भोईर यांना निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी यापूर्वी चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली आहे ते या पोट निवडणुकीसाठी तेही प्रबळ इच्छुक होते. मात्र पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी नाना काटे यांचे एकमुखी प्रचाराचे धोरण हातात घेतल्याने दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यासह सर्व कार्यकर्ते प्रचारात एकवटले आहेत.
नाना काटे यांच्या प्रचाराची धुरा पक्षाने अनुभवी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या शिरावर दिली आहे. त्यामुळे नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी भोईर यांना आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे.




