पिंपळे सौदागर : एकेकाळी गुजरातचे रोल मॉडेल दाखवून काहींनी देशाची सत्ता हस्तगत केली. मीही पिंपरी चिंचवडचे रोल मॉडेल महाराष्ट्रभर दाखवून राज्याची सत्ता जिंकायला हवी होती ती उणीव भरून काढण्यासाठी आता आपल्या पक्षाचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपळे सौदागर स्मार्ट प्रभाग करून दाखवला आहे. याच पिंपळे सौदागरचे रोल मॉडेल भविष्यात चिंचवड विधानसभेला लोकप्रतिनिधी म्हणून लाभणार आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटले आहे.
पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थांचा आदर्श घ्या…
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी चिंचवड विधानसभेतील पक्षाची एकजूट राखत 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे. चिंचवड विधानसभेसाठी इच्छुकासह पिंपरी, भोसरी विधानसभेतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढील काही दिवस धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळा यामध्ये जास्त वेळ खर्च करू नये. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डोळ्यात तेल घालून काम करावे. ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम आहे. पिंपळे सौदागर ग्रामस्थांची एकजूट सर्व पदाधिकाऱ्यांच्या मध्ये दिसली पाहिजे असे पवार यांनी म्हंटले आहे.
- विधानसभेचा विजय पालिका निवडणुकीतील परिवर्तनाचे नांदी
राष्ट्रवादी काँग्रेस कडून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्याच दिवशी पिंपळे सौदागर येथील ग्रामस्थांनी मतभेद विसरून आपल्या माणसासाठी एकत्र येऊन नाना काटे यांना विजयासाठी एकजूट दाखवली. हीच एकजूट सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी युवक व महिलांना सोबत घेऊन दाखवा. हीच एकजूट विधानसभेतील पालिका निवडणुकीतील परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. असा विश्वास दाखवत अजित पवार यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले.



